Posted on Mar 26, 2019

मोडी लिपी भाषांतर लिप्यंतरकार कांचन कराई

काही दिवसांपूर्वी एका मोडी दस्तऐवजामध्ये ’सु’ हे अक्षर निराळ्या पद्धतीने लिहिलेले आढळले. आजवर वाचलेल्या कागदपत्रांमध्ये ’सुहूर ’ किंवा ’सूद’ सारखे शब्द लिहिताना पारंपारिक ’सु’ हेच अक्षर वाचलेले होते. जर संदर्भाने वाचन करण्याची सवय नसेल तर अश्या नवीन प्रकारे काढलेल्या अक्षरामुळे शब्दाची गफलत होऊ शकते.

अश्या प्रकारचा नवीन ’सु’ अक्षर लिहिण्याची पद्धत मोडीच्या पारंपारिक लपेटीयुक्त लेखनाला भेद देणारी असली तरी अक्षराचं वळण अतिश्य सुंदर आहे. कदाचित लेखनिकाने चुकून पारंपारिक ’सु’ ऐवजी मोडी मधला व’ काढला असावा आणि पुढे खाडाखोड नको म्हणुन त्याला असे वळण देऊन मोडी अक्षर आपल्याला हवे तसे वळवून घेतले असावे.

- कांचन कराई
॥ मोडी सेवेसी तत्पर ॥
Contact Us
Message sent. We'll get back to you soon.