Posted on Mar 21, 2019

मोडी लिपी भाषांतर लिप्यंतरकार कांचन कराई

रूपये व्याज सुध्धा ( रूपये व्याज सुद्धा )

मोडी लिहिण्याची पद्धत पहा.

"ये" अक्षरामधील मात्रा वरच थांबविता आली असती पण ती पुन्हा वळवून शिरोरेघेवर आणून थांबवली आहे. इतकेच नव्हे तर "व्याज" शब्द लिहिताना मोडी ’व’ ला देवनागरीसम "या"जोडला आहे पण तो देवनागरी "पा" सारखा दिसत आहे.

त्यातच ’रूपये’ शब्दामधील ’ये’ची खाली वळवलेली मात्रा "व्या" च्या शिरोरेघेवर येऊन विसावल्याने तो शब्द ’व्याज’ ऐवजी निराळाच असल्याचा भास निर्माण होतो. जर आधीचे व नंतरचे शब्द माहित नसतील तर संदर्भाने वाचन करणं अशक्य होऊन गोंधळ उडू शकतो.

व्यक्तिपरत्वे हस्ताक्षरात परिवर्तन होत असल्याने मोडी वाचन करताना लिप्यंतरकाराला अश्या अनेक गोष्टींचे भान राखावे लागते.

वरील गोष्टींव्यतिरिक्त ह्या लेखनात आणखी ३ वैशिष्ट्ये दिसताहेत, ती कोणी सांगू शकेल का?
Contact Us
Message sent. We'll get back to you soon.